बसचे ब्रेक फेल; चालत्या बसमधून ४० प्रवाशांनी घेतल्या उड्या! वाहकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले जीव(msrtc login)

वाशिम आगाराची बस महानपासून सहा किमी अंतरावर कास्मार, वाघा जवळ येताच एस. टी. बसचे ब्रेक फेल झाले(msrtc login). ही बाब चालक व प्रवाशांच्या लक्षात आली. प्रसंगावधान दाखवत बसची गती कमी होताच ४० प्रवाशांसह वाहकाने चालत्या बसमधून उड्या घेतल्या. हा फिल्मी स्टाईल थरार इथेच संपला नाही. पुढे चालकाने सिमेंट काँक्रीटच्या नालीवर बस चढवून थांबविली आणि चालकही सुखरूप बचावला. एम. टी. गेडाम असे प्रसंगावधान राखणाऱ्या एस.टी. बस चालकाचे नाव आहे.

 

वाशिम आगाराची एस.टी. बस (एम. एच. ४० वाय ५३३०) वाशिमवरून अकोला मार्गे पिंपरी, शेलूबाजार, महान, बार्शीटाकळी, अकोलाकरिता वाशिम येथून सोमवारी (दि. २२) सकाळी नऊ वाजता मार्गस्थ झाली. ही बस सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास महानपासून सहा किलोमीटर अंतरावरील कास्मार, वाघा जवळ येताच समोरील ट्रकला ओव्हरटेक करताना एस.टी. बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. एस.टी. बसमध्ये असलेल्या ४० प्रवाशांचे जीव कसे वाचवावे आणि बस कशी थांबवावी, याकडे चालकाचे लक्ष होते. वाघा गावासमोर रस्त्याच्या कडेला गिट्टीचे ढिगार आणि चढ पाहून चालकाने गिअरद्वारे बस slow केली.

उन्हाळी सुट्टी मधे एसटी ने केली भरमसाठ कमाई, उत्पन्न कोटींच्या पुढे, click करून वाचा माहिती 

बसची गती कमी होताच बसमधील सर्व ४० प्रवाशांसह वाहकाने बाहेर उडी घेतली. ही एस.टी. बस चालकाच्या अनेक प्रयत्नांनंतर थांबली नाही. त्यामुळे एका ठिकाणी चालकाने सिमेंट काँक्रीटच्या नालीवर बस चढवून थांबविली. तब्बल पाच किमी अंतरावर जाऊन बस थांबल्याचे सांगण्यात येत आहे.(msrtc login)

 

प्रवाशांसोबत वाहकाचा दोन कि.मी. पायी प्रवास!(msrtc login)

 

प्रवाशांसोबत एस. टी. वाहक एस. एस. वाडेकर यांनीसुद्धा चालत्या बसमधून बाहेर उडी घेतली होती. प्रवाशांसोबत तेसुद्धा दोन किलोमीटर पायी चालत येत होते. दरम्यान, बसमध्ये राहिलेली तिकीट मशीन घेऊन चालक गेडाम झोडगा फाट्यावर पोहोचले. तेथून ४० प्रवाशांना सुखरूप दुसऱ्या बसमध्ये रवाना केले. सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला इजा पोहोचली नाही.(msrtc login)

 

गती कमी करून बस रस्त्यावर आडवी-तिरपी केली. यावेळी बसमधील सर्व प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी बसमधून लवकर उड्या मारण्याचा सल्ला दिला. त्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. या सर्व प्रकरणात कोणाला काही दुखापत झाली नाही हे खूप महत्वाचे झाले.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या blog ला subscribe करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top