Bank adhar link online 2024:
घरी बसल्या तुमच्या बँक अकाउंटला कार्ड लिंक करा जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया .
Bank Aadhar link online 2024 .
सर्व बँकिंग सेवा ऑनलाइन मिळवण्यासाठी आणि थेट रोख रक्कम मिळवण्यासाठी, शिष्यवृत्ती आणि पेन्शन यांसारखे विविध सरकारी योजनांचे ऑनलाईन लाभ मिळवण्यासाठी आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. तरीही अनेक नागरिकांना याचा कसलाच फायदा झाला नाही कारण त्यांना याबाबतीत कसलीच माहिती नाही. जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक केला नसेल तर तुम्हाला पुढील येणाऱ्या भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.
पण आता काळजी करण्याची गरज नाही आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये आपल्या बँक खात्याला आधार कार्ड कशाप्रकारे लिंक करायचे ते सांगणार आहोत तुम्हाला आजच्या लेखांमध्ये संपूर्ण लिंकिंग प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे करता येईल परंतु या लेखात आम्ही बँक आधार लिंक ऑनलाईन बद्दल माहिती देणार आहोत जेणेकरून तुम्हाला कोणत्याही कार्यालयात किंवा बँकेत जावे लागणार नाही जर तुम्हाला बँक आधार लिंक ऑनलाइन बद्दल जाणून घ्यायचे असेल तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे.
Bank Aadhar link online 2024.
आजच्या काळात फसवणुकीचे व्यवहार टाळण्यासाठी आणि सहज मोठ्या रकमेचे व्यवहार करण्यासाठी बँक खाते आधार कार्ड ची लिंक करणे अनिवार्य झाले आहे त्याचवेळी अनेक सरकारी योजना अंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डशी जोडलेले बँक खाते आवश्यक आहे .अशा परिस्थितीत आधार कार्ड बँक खात्याशी कसे लिंक करायचे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
बँक खात्याशी आधार लिंक करणे का महत्त्वाचे आहे .
जर तुम्हाला असे वाटत असेल की बँक आधार लिंक करणे ऐच्छिक आहे आणि त्याचे कोणतेही महत्त्व नाही तर तुम्ही चुकीचे आहात बँक खात्याशी आधार लिंक करण्याचे महत्त्व काय आहे ते पहा.
- आधार कार्ड ला बँक अकाउंट सोबत लिंक करून तुम्ही डिजिटल पेमेंट सहज आणि सुलभ रित्या करू शकता यामुळे कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना मिळते .
- केवायसी प्रक्रिया सोपी होते जेणेकरून एखाद्याला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ सहजरित्या मिळू शकेल .
- याप्रकारे कोणत्याही व्यक्तीच्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा देऊ शकते बँकांशी आधार लिंक करून आधार सक्षम पेमेंट सिस्टम सोपे होते .
- यामुळे आर्थिक सुरक्षितता निश्चित होते ज्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी होते
आधार कार्ड बँक अकाउंट सोबत लिंक करण्याचे फायदे.
तुम्ही तुमचे बँक खाते आधार कार्ड शी लिंक केल्यास तुम्हाला खालील फायदे मिळतील.
- बँक आधार लिंक मुळे खाते उघडण्याची प्रक्रिया अखंडपणे होते आणि कमीत कमी कागदपत्रांसह विविध योजनांचे लाभ घेणे सोपे होते
- विविध सरकारी निवृत्ती वेतन कल्याण निधी शिष्यवृत्ती इत्यादीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी होते .
- त्यामुळे बँक खाते अधिक सुरक्षित होते आणि खातेधारक देशाच्या कोणत्याही ठिकाणाहून बँकेचे व्यवहार करू शकतो.
- आधार सक्षम पेमेंट प्रणाली द्वारे सरकारी लाभ सहजपणे उपलब्ध होतात.
बँक खात्याशी आधार कार्ड कसे लिंक करावे?
पुढे आम्ही तुम्हाला बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्याच्या सर्व पद्धतींची माहिती देऊ ज्याद्वारे बँक आधार लिंक ऑनलाईन केले जाऊ शकते तुम्ही दिलेल्या माहितीनुसार तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी सहज लिंक होऊ शकते .
आधार कार्ड इंटरनेट बँकिंग सोबत लिंक करा.
- तुम्ही वापरत असलेल्या इंटरनेट बँकिंग अधिकृत पोर्टलवर लॉगिन करा उदाहरणार्थ जर तुम्ही SBI बँकिंग सर्विस चा उपयोग करत असाल तर SBI इंटरनेट बँकिंग पोर्टलवर VISIT करा.
- पोर्टल वर गेल्यानंतर आधार आणि बँक खाते लिंक करण्यासाठी वरील ऑप्शन वर क्लिक करा
- मग त्या अकाउंटला ओपन करा ज्या अकाउंटला तुम्ही आधार लिंक करू इच्छिता.
- त्यानंतर दिल्या गेलेल्या कॉलम मध्ये आधार नंबर टाकून सबमिट करा .
- इतके झाल्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर चे शेवटचे दोन अंक तुम्हाला स्क्रीनवर दिसतील आणि तुमच्या आधार कार्ड ला अकाउंट लिंक करण्यासाठी त्या नंबर वर OTP प्राप्त होईल त्यानंतर तुम्हाला तिथे OTP टाकावा लागेल.
एटीएम मध्ये बँक खाते कशाप्रकारे आधार सोबत लिंक करावे.
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बँकेच्या एटीएम वर जावे लागेल.
- त्यानंतर तुमच्या बँकेच्या डेबिट कार्डला एटीएम मशीन मध्ये टाकून पिन टाकावा लागेल.
- त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर काही पर्याय दिसतील यामधून आधार लिंकच्या पर्यायाला निवडावे लागेल.
- पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल.
- याप्रकारे बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक होईल.
मोबाईल ॲप द्वारे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करा.
- तुम्ही ज्या इंटरनेट बँकिंगचा वापर करत असाल त्या मोबाईल आपला ओपन करा.
- मोबाईल ॲप डाऊनलोड होत नसेल तर Google Play Store मध्ये mobile banking ॲप डाऊनलोड करा
- आता या ॲपला ओपन करून यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- यानंतर या ॲपमध्ये दिल्या गेलेल्या सेवा विभागावर क्लिक करा आणि लिंक आधार या पर्यायाला क्लिक करा त्यानंतर आधार नंबर अपडेट करा या पर्यायावर क्लिक करा.
- मग त्या खात्याची निवड करा ज्या खात्याला तुम्ही आधार कार्ड जोडू इच्छिता.
- त्यानंतर दिल्या गेलेल्या कॉलम मध्ये आधार नंबर टाकून सबमिट करा.
- अशाप्रकारे मोबाईल ॲप द्वारे तुम्ही तुमच्या बँकेचे आधार लिंक करू शकता.
मिस्ड कॉल सेवेने बँक खात्याला आधार लिंक करा.
- प्रत्येक बँकेद्वारा एक मिस्ड कॉल सर्विस नंबर दिला जातो ज्या नंबर वर कॉल करून विविध बँकिंग सर्विस चा लाभ प्राप्त केला जाऊ शकतो. आपल्या आधारला बँकेसोबत लिंक करण्यासाठी बँकेद्वारा उपलब्ध केले गेलेल्या नंबर वर मिस्ड कॉल करा.
- मग बँकेकडून तुम्हाला कॉल केला जाईल आणि IVR वरून पर्याय निवडण्यास सांगितले जाईल.
- येथे आधार लिंकचा पर्याय निवडून तुम्हाला बारा अंकी आधार नंबर द्यावा लागेल.
- यानंतर याला सत्यापित करावे लागेल.
- आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होण्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला SMS माध्यमातून पाठवला जाईल.
एसएमएस सेवेद्वारे आपल्या बँक खात्याला आधार सोबत लिंक करा.
- सर्वप्रथम तुम्ही तुमचे एसएमएस ॲप ओपन करा त्यामध्ये हा मेसेज टाईप करा.
- आधार नंबर स्पेस<यूआयडी स्पेस>बँकेचा कस्टमर अकाउंट नंबर.
- आता या मेसेजला आपल्या बँक ग्राहक सेवा नंबर वर पाठवा.
- बँकेला तुमचा मेसेज मिळेल त्यानंतर तुमचे बँक खाते आधार सोबत लिंक केली जाईल आणि याची सूचना तुम्हाला टेक्स्ट मेसेज च्या माध्यमातून प्राप्त होईल.