Bhu aadhar( ULPIN) 2024:
नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत की भू आधार काय आहे. भू आधार मुळे जमिनीचा मालकी हक्क स्पष्ट होतो आणि जमिनीमुळे होणारे वाद विवाद या भू आधार मुळे बंद होतात. भू आधार या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील सर्व जमिनीला 14 अंकांचा विशिष्ट ओळख क्रमांक मिळेल. ज्याला भू-आधार (ulpin)च्या नावाने ओळखले जाईल.
केंद्र सरकारने बजेट 2024 मध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील जमिनीच्या नोंदी सुधारण्यासाठी हे एक उत्तम पाऊल उचलले आहे. या अंतर्गत ग्रामीण भागातील जमिनीसाठी विशिष्ट ओळख क्रमांक म्हणजेच भू आधार आणि सर्व शहरी भागामध्ये नोंदीचे डिजिटलायझेशन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सरकार पुढील तीन वर्षांमध्ये या जमिनीच्या नोंदीमध्ये पूर्णपणे सुधार करेल यासाठी राज्यांना वित्तीय सहाय्यता केली जाईल. भू आधार ने जमिनीचा मालकी हक्क स्पष्ट होईल आणि जमिनीमुळे होणारे वाद विवाद बंद होतील.
🤔 काय आहे भू आधार ( ULPIN)?
या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील सर्व जमिनींना 14 अंकी विशिष्ट ओळख क्रमांक मिळेल ज्याला भू आधाराच्या नावाने ओळखले जाईल यामध्ये जमिनीच्या ओळख क्रमांकासोबत सर्वे, जमिनीचा नकाशा आणि मालकी व शेतकऱ्याचे रजिस्ट्रेशन केले जाईल. याचा आणखीन एक फायदा होईल ज्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज घेणे खूप सोपे होणार आहे. यामुळे इतर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधा घेणे सोपे होणार आहे. सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना भारताच्या भूमी नोंदणीला डिजिटल बनवण्यासाठी आणि एकीकडे भूमी अभिलेख व्यवस्थापन प्रणाली देण्यासाठी 2008 मध्ये सुरुवात केली होती.
📍शहरांमध्ये GIS मॅपिंग होईल.
शहरी भागात जमिनीच्या नोंदीची GIS मॅपिंग सोबत डिजिटल केली जाईल. संपत्ती रेकॉर्ड प्रशासन आणि टॅक्स साठी एक आयटी आधारित सिस्टम स्थापित केले जाईल त्यामुळे शहरी भागातील वित्तीय स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी मदत होईल.
🤔 कशाप्रकारे काम करतो भु आधार( ULPIN)? .
- जमिनीच्या भूखंडास GPS टेक्निकच्या माध्यमातून jio tag📍 टॅग दिला जातो कारण की त्या भागाची भौगोलिक स्थिती ची ओळख करणे सोपे होईल.
- त्यानंतर सर्वेक्षण करता त्या भूखंडाच्या सीमा मोजतात.
- भूखंडासाठी जमीन मालकाचे नाव वापर श्रेणी क्षेत्र इत्यादी तपशील गोळा केले जातात.
- सर्व गोळा केलेले तपशील नंतर जमीन अभिलेख व्यवस्थापन प्रणालीमध्ये प्रविष्ट केले जातात.
- सिस्टीम आपोआप प्लॉट साठी 14 अंकी आधार क्रमांक तयार करते जो डिजिटल रेकॉर्डशी जोडलेला असतो.
📍भू आधार( ULPIN) मध्ये कोण कोणती माहिती असते?
आपल्या आधार कार्ड प्रमाणेच जमिनीचे सुद्धा आधार कार्ड तयार करण्यात आले आहे भू आधार मध्ये राज्याचा कोड तसेच जिल्ह्याचा कोड आणि उपजिल्हा कोड, गावचा कोड प्लॉटचा युनिक आयडी क्रमांक. इत्यादी भू आधार क्रमांक डिजिटल आणि बहुतेक जमीन अभिलेख दस्ताऐवजावर छापलेला आहे जरी तुमची जमीन हस्तांतरित असेल किंवा अनेक भागांमध्ये विभागली गेली असेल किंवा त्यात काही बदल झाला असेल तरी भू आधार क्रमांक भूखंडाच्या भौगोलिक सीमांसाठी समान राहील.
भू आधार( ULPIN) चे फायदे.
✅ जमिनीचा स्तर नकाशे आणि जमिनीचे माप यांच्या माध्यमातून भूमी अभिलेख सुनिश्चित केला जातो.
✅ भूखंडाची ओळख अचूकपणे होते आणि अनेकदा जमिनीमुळे होणारे वाद बंद होतात.
✅ जमिनीला आधारशी लिंक करून ऑनलाइन पद्धतीने जमिनीच्या नोंदी पर्यंत पोहोचणे सोपे होते.
✅ भूखंडाशी संबंधित संपूर्ण इतिहास आणि जमिनीचा मालकी हक्क यांना सुद्धा ट्रेक केले जाऊ शकते.
✅ धोरण तयार करण्यासाठी सरकारला जमिनीची अचूक माहिती उपलब्ध होते.