जर तुम्हाला आधार कार्ड वरची फोटो पसंत नसेल तर आजच ऑनलाईन अपडेट करा.

Adhar card photo change:

नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरील फोटो पसंत नसेल तर आजच ऑनलाईन अपडेट करून घ्या आज कालच्या काळात सुद्धा काही लोक आपल्या जुन्या आधार कार्डचा खूप कालावधीपासून वापर करत आहेत. जर तुम्ही सुद्धा तुमच्या आधार कार्ड मधील  फोटोमध्ये बदल करू इच्छित असाल तर आज आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत की तुम्ही कशा प्रकारे  तुमच्या आधार कार्डचा फोटो बदलू शकता.

आजच्या काळात आधार कार्ड च्या माध्यमातून सर्व काम केले जातात आणि अशा मध्ये जर तुमच्या आधार कार्डवर खूप जुना फोटो असेल तर काही जागी तुमचा डाटा मॅच केला जात नाही अथवा तुमचा फेस स्कॅन होऊ शकत नाही यामुळे तुम्हाला अनेक  समस्यांना तोंड द्यावे लागेल . यामुळे तुमचे आधार कार्ड वैध धरले जात नाही .यामध्ये तुम्ही कशाप्रकारे फोटो बदलू शकता याबाबत तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत.

आधार कार्ड काय आहे?

आधार कार्ड च्या बाबतीत सांगायचे झाल्यास  प्रत्येकाला माहित आहे  की हा एक प्रकारचा मुख्य दस्तावेज आहे. याच्या माध्यमातून तुमचे सर्व कार्य केले जातात जर तुम्हाला कसल्याही प्रकारचा अर्ज करायचा असल्यास अथवा बँक खाते उघडण्यासाठी आणि प्रत्येक सरकारी किंवा प्रायव्हेट कामांसाठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट आधार कार्ड आहे. तसेच आधार कार्ड हे तुमची ओळख आहे . आधार कार्ड शिवाय तुम्हाला कसलेच काम करता येणार नाही भारत सरकारने प्रत्येक सरकारी कामांमध्ये आधार कार्ड अनिवार्य केले आहे. यामुळे तुमचे आधार कार्ड अपडेट असणे खूप गरजेचे आहे.

परंतु अनेक वेळा आधार कार्डवर जुना फोटो लोकांना खूप खराब दिसतो अशामध्ये जर तुम्ही आपल्या जुन्या फोटोमध्ये बदल करू इच्छित असाल तर आज आम्ही तुम्हाला कशाप्रकारे फोटो बदलता येईल याबाबत सांगणार आहोत.

आधार कार्ड मध्ये फोटो कशाप्रकारे अपडेट करावा?

जर तुम्ही सुद्धा तुमच्या जुन्या आधार कार्ड मधील फोटोमध्ये बदल करू इच्छित असाल तर यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्ड कडून दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल तेथे गेल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसून येतील ज्या मधून तुम्हाला माय (My adhar)आधार हा पर्याय दिसेल तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल जिथे तुम्हाला गेट आधार( Get adhar) च्या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल आता तुमच्यासमोर (appointment book)अपॉइंटमेंट बुक करायचे पेज ओपन होईल ज्याच्या माध्यमातून तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता आता तुम्हाला तुमचे अपॉइंटमेंट बुक करायचे आहे .ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे महत्त्वपूर्ण माहिती भरावी लागेल जेथे तुम्हाला नाव(name), पत्ता(address), मोबाईल नंबर( phone number) हे सर्व भरावे लागेल .

यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला विचारले जाईल की तुमच्या आधार कार्ड मध्ये काय काय बदल करायचा आहेत या सर्व पर्यायांपैकी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी बदल करायचा आहे त्या पर्यायाला निवडावे लागेल यानंतर तुम्हाला appointment चा फॉर्म सबमिट करावा लागेल पेमेंट प्रोसेस ला पूर्ण केल्यानंतर पावती प्राप्त करून घ्यावी लागेल. अशाप्रकारे तुम्ही तुमचा फोटो अपडेट करू शकता.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top