How to success in business : नमस्कार मित्रांनो आज आपण पाहतो की असे अनेक जन असतात की जे अपयशी होण्याच्या भीतीने व्यवसायामध्ये उतरू शकत नाहीत हा लेख अशा व्यक्तींसाठी आहे .
आपण कधीही अपयशी होण्याची भीती बाळगू नये कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. बहुतेक उद्योजक आपली ओळख यशा सोबत जोडतात त्यामुळे त्यांना अपयशाची भीती वाटते अपयश ही खरे तर पुढे जाण्याची एक उत्तम संधी असते जेव्हा तुम्ही अपयशी ठरतात तेव्हा तुम्हाला एक चांगला अनुभव मिळतो ज्याचा तुम्हाला प्रात्यक्षिक रित्या खूप चांगला फायदा होतो आणि तुम्ही त्याबद्दल इतरांनाही सांगू शकता.
१. अपयशी व्हायची भीती कधीही बाळगू नये.
आजच्या युगात असे अनेक जण आहेत की जे व्यवसायामध्ये अपयशी होण्याच्या भीतीमुळे व्यवसायामध्ये उतरू शकत नाहीत . यामुळे बहुतेक Entrepreneurs घाबरत असतात आणि ते स्वतःची ओळख ही यशा सोबत जोडतात. त्यांना अपयशाची भीती असते.
२. मॅनेजमेंट सांभाळणे.
आपला व्यवसाय कोणताही असो, मग तो छोटा असो अथवा मोठा असो प्रत्येकाने मॅनेजमेंटची पूर्ण काळजी घेतली पाहिजे बऱ्याचदा अनेक उद्योजकांना वाटते की याबाबतीत नंतर विचार करता येईल परंतु प्रत्येक उद्योजकाने व्यवसाय सुरू करण्याआधीच याचा विचार केला पाहिजे प्रत्येक व्यवसायासाठी प्रशासन असणे आवश्यक आहे नाहीतर नंतर मोठ्या प्रमाणात अडचणी येण्याची शक्यता असते अलीकडेही तुम्ही अनेक startup मधील मॅनेजमेंट समस्यांच्या बातम्या ऐकल्या असतील.
३. आपल्या व्यवसायामध्ये योग्य लोकांची निवड करा.
तुमच्या व्यवसायाच्या स्टार्ट अप साठी योग्य लोकांची निवड करणे आवश्यक आहे याबाबत तुम्ही विशेष लक्ष दिले पाहिजे हे त्या लोकांबद्दल असू शकते ज्यांना तुम्ही कामावर घेत आहात किंवा ज्यांच्या सोबत तुम्हाला व्यवसाय करायचा आहे त्यांच्याशी वाद घालण्यात तुमचा अमूल्य वेळ घालवण्यापेक्षा अशा लोकांची निवड करा की जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतील आपल्या देशातील लोकांमध्ये खूप टॅलेंट आहे त्यामुळे लोकांवर जास्त लक्ष असायला हवे.
४. आपल्या ग्राहकाला प्राधान्य द्या.
अनेक व्यावसायिक आहेत जे आपल्या ग्राहकाला प्राधान्य देत नाहीत. असे अनेक व्यवसाय आहेत की जे याचे पालन करीत नाहीत याचा परिणाम असा होतो की त्यांचा व्यवसाय हळूहळू त्यांचे आकर्षण गमावू लागतात. चांगल्या मजबूत मार्केटिंग मुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित तर होतात आणि एकदा येतात परंतु पुन्हा येत नाहीत किंवा इतर कोणालाही त्यांच्याकडे न जाण्याचा सल्ला देतात अशा परिस्थितीत तुमच्या व्यवसायाला फार मोठ्या प्रमाणात फटका बसतो.
५.compitition स्पर्धेला घाबरू नका.
सर्वात आधी असा व्यवसाय सुरू करायचा प्रयत्न करा की ज्यामध्ये स्पर्धा शून्य असेल किंवा असली तरी ती खूप कमी प्रमाणात असेल मात्र जर तुमचा व्यवसाय चांगला असेल तर तुम्हाला येणाऱ्या काळात स्पर्धक नक्कीच मिळतील पण यामुळे तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला तुमच्या व्यवसायात quantity पेक्षा कॉलिटी ला महत्त्व देणे गरजेचे आहे तुम्हाला फक्त तुमचे उत्पादन चांगले ठेवावे लागेल आणि प्रत्येक दिवशी ते सुधारण्याचा प्रयत्न करावा लागेल कधी कधी नफ्याचा विचार न करता केवळ ग्राहकांसाठी आकर्षण ठरण्यासाठी प्रचंड सवलत ठेवा जेणेकरून स्पर्धक तुमच्याशी कॉम्पिटिशन करू शकणार नाही आणि तुमचे ग्राहक तुमच्याशी जुळून राहतील. याचा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या व्यवसायाला पुढे येण्यासाठी फायदा होईल. आणि तुम्ही एक चांगले यशस्वी उद्योजक ठराल.