Download Death Certificate नमस्कार मित्रानो तुम्हा सर्वांना माहिती आहे कि मृत्यू प्रमाणपत्र बनवणे कशाप्रकारे गरजेचे आहे. भारताच्या प्रत्येक नागरिकांची मृत्यू झाल्यानंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबाद्वारे हे प्रमाणपत्र बनवले जाते. मृत्यू प्रमाणपत्र ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने बनविले जाते. चला तर मग मित्रानो आपण या लेखामध्ये मृत्यू प्रमाणपत्र काय आहे, त्याचे लाभ, पात्रता, उद्देश, आणि लागणारे कागदपत्रे याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
मृत्यू प्रमाणपत्र ऑनलाईन कसे काढावे. Death Certificate Online Apply.
मृत्यू प्रमाणपत्र हे एक सरकारी कागद आहे, जे कि मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तींना दिले जाते. या प्रमाणपत्रामध्ये मृत्युची तारीख याबद्दल माहिती असते. सर्व धर्माच्या नागरिकांना हे काढणे अनिवार्य आहे. या प्रमाणत्रानुसार मृत्यू झालेल्या व्यक्तीची संपत्ती ही त्याने जारी केलेल्या वारसदारास दिली जाते. तसेच हे प्रमाणपत्र विम्याचा क्लेम करण्यासाठी अत्यंत उपयोगी होईल.
मित्रानो Death Certificate हा मृत्यू झाल्याच्या 21 दिवसांच्या आत कुटुंबातील व्यक्तीला काढणे अनिवार्य आहे. तसे नाही झाल्यास दंड भरावा लागेल. मृत्यू पमाणपत्र बनवण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीला त्याची फीस ही द्यावी लागेल. ही फीस वेगवेगळ्या राज्यासाठी वेगवेगळी ठरवून दिलेली आहे.
मृत्यू प्रमाणपत्र अर्ज. Download Death Certificate
Death Certificate घेण्यासाठी मृतकच्या कुटूंबाला यासाठी अर्ज करावा लागेल. हा अर्ज तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करू शकतात, ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयात जावे लागेल. आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट वेबसाईट वर जावे लागेल.
जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला तर तुम्हाला कोणत्याही सरकारी ऑफिस ला जाण्याची गरज पडणार नाही यामुळे तुमचा अमूल्य वेळ ही वाचेल.
Death Certificate चे होणारे लाभ कोणते.
- Death Certificate एक खुप महत्वाचे सरकारी कागदपत्र आहे.
- प्रत्येक धर्माच्या नागरिकाला मृत्यू प्रमाणपत्र काढणे अनिवार्य आहे.
- आता सरकार द्वारे मृत्यू प्रमाणपत्र काढणे अनिवार्य झाले आहे.
- हे प्रमाणपत्र मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला दिले जाते.
- प्रमाणपत्रमध्ये मृतकाच्या मृत्यूचे कारण, तारिख याबद्दल माहिती दिलेली असते.
- या प्रमाणपत्राच्या माध्यमातून मृत्यू झालेल्या व्यक्तीची असलेली संपत्ती ही त्यांच्या वारसदारास दिली जाते.
- यामुळे कुटुंबाला विम्याचा क्लेम तसेंच सरकारी योजनाचा फायदा घेता येईल.
- मृत्यू झाल्यानंतर 21 दिवसाच्या आत रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.
पात्रता आणि लागणारी कागदपत्रे.
- अर्ज करणारा हा मृत्यू झालेल्या व्यक्तीचा वारसदार असावा लागेल.
- मृत्यू झालेल्या व्यक्तीचे राशनकार्ड आवश्यक.
- अर्ज.
- शपथ पत्र
- आधार कार्ड.
- मृत्यू झालेल्या व्यक्तीचा पासपोर्ट साईझ फोटो.
अर्ज करण्याची प्रक्रिया.
- सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या राज्याच्या ऑफिशियल वेबसाईट वर जावे लागेल.
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- होम पेज वर तुम्हाला Apply now च्या ऑपशन ला क्लीक करावे लागेल.
- यानंतर तुमच्या समोर अर्ज करण्यासाठीचा फॉर्म ओपन होईल.
- यामध्ये विचारलेली प्रश्नाची उत्तरे अचूक द्यावी लागतील. जसे कि नाव, मोबाईल नंबर, मेल, आयडी इत्यादी.
- यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- यानंतर तुम्हाला submit या ऑपशन ला क्लीक करावे लागेल.
- याप्रकारे तुम्ही मृत्यू प्रमाणपत्र बनवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.