F D वर बंपर रिटर्न पाहिजे असतील तर हे बेस्ट ऑप्शन आहेत या बँकांमध्ये एक वर्षाच्या गुंतवणुकीवर मिळेल 8% व्याज दर.

जर FD वर बंपर रिटर्न पाहिजे असेल तर हे आहेत बेस्ट ऑप्शन: 

फिक्स डिपॉझिट ही अजूनही ग्राहकांच्या  बचतीच्या सुरक्षित गुंतवणुकीसाठी पहिली पसंत आहे जर तुम्हाला भविष्यामध्ये FD मध्ये गुंतवणूक करून बंपर रिटर्न मिळवायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे खरं तर सध्या देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँका आणि खाजगी क्षेत्रातील बँका त्यांच्या ग्राहकांना FD वर बंपर परतावा देत आहेत तुम्हालाही एक वर्षाची एफडी करून जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर यासाठी या दहा बँका तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात एक वर्षाच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या या दहा बँकांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

F D वर बंपर परतावा पाहिजे असेल तर हे आहेत बेस्ट ऑप्शन.

FD करत असताना या गोष्टी लक्षात घ्या.

फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit) मध्ये गुंतवणूक करण्याआधी व्याजदर आणि मुदतपूर्तीचा कालावधी याबाबतीत विचार करणे आवश्यक आहे. आपल्या गुंतवणुकीवर चांगल्या प्रकारे पैसे कमावण्यासाठी वेगवेगळ्या बँका आणि वित्तीय संस्था यांच्याद्वारे दिल्या जाणाऱ्या व्याजदरांची तुलना करा.

या व्यतिरिक्त Fd चा कालावधी आणि लिक्विडीटी यांचे मूल्यांकन करावे कारण यामुळे हे सुनिश्चित होते की जर तुमच्या वित्तीय उद्देश आणि लिक्विडिटी आवश्यकतांच्या नुसार असतील तर एफ डी मधून तुमच्या गुंतवणुकीबाबत सुरक्षा मिळते परंतु मुदतपूर्वी गुंतवलेले पैसे काढल्यानंतर तुम्हाला दंड बसू शकतो यामुळे या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतरच तुम्ही गुंतवणुकीचा प्लॅन करणे आवश्यक आहे.

FD मध्ये केव्हा गुंतवणूक करावी.

फिक्स डिपॉझिट (Fix deposit) मध्ये गुंतवणूक करण्याचा कालावधी विविध घटकांवर अवलंबून असतो ज्यामध्ये सध्याचे व्याजदर आणि मार्केट मधील स्थिती आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे यांचा समावेश होतो.

साधारणपणे, जेव्हा व्याजदर जास्त असतो तेव्हा तुमचे पैसे एफडी मध्ये लॉक केल्यानंतर गुंतवणुकीच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त परतावा मिळू शकतो. याव्यतिरिक्त जेव्हा व्याजदर कमी होत असतो तेव्हा दर स्थिर होण्याची वाट पाहणे किंवा चांगला परतावा देणारा पर्यायी गुंतवणुकीचा ऑप्शन शोधणे महत्त्वाचे ठरू शकते.

FD बंपर रिटर्न पाहिजे असेल तर हे आहेत बेस्ट ऑप्शन येथे 7.75 टक्के व्याज मिळत आहे.

डीसीबी बँक त्यांच्या सामान्य ग्राहकांना एक वर्षाची फिक्स डिपॉझिट वर 7.25 टक्के व्याज देत आहे. तसेच वरिष्ठ नागरिक ग्राहकांना 7.75 टक्के व्याज मिळत आहे. तसेच दुसरीकडे tamilnadu markentile बँक आपल्या सामान्य ग्राहकांना एका वर्षाच्या एफडीवर 7.25% आणि वरिष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज देत आहे.

कॅनरा बँक (canara bank) आपल्या सामान्य ग्राहकांसाठी एका वर्षाच्या एफडीवर सात टक्के आणि वरिष्ठ नागरिक ग्राहकांना 7.50% व्याज देत आहे .या व्यतिरिक्त ड्युश बँक आपल्या सामान्य ग्राहकांना एका वर्षाच्या FD डी वर 7 टक्के आणि वरिष्ठ नागरिक ग्राहकांसाठी सुद्धा इतकाच व्याजदर भेटत आहे. कर्नाटक बँक आपल्या सामान्य ग्राहकांसाठी एक वर्षाच्या एफ डी वर 7 टक्के आणि वरिष्ठ नागरिक ग्राहकांसाठी 7.40% इतका व्याजदर देत आहे.

(SBI )एस बीआय ही बँक 7% टक्के पेक्षा जास्त व्याजदर देत आहे.

तसेच आरबीएल बँक आपल्या सामान्य ग्राहकांना एक वर्षाच्या एफडीवर 7 टक्के आणि वरिष्ठ नागरिकांसाठी 7.50% व्याज देत आहे. तसेच बँक ऑफ इंडिया (bank of India)आपल्या सामान्य ग्राहकांसाठी एक वर्षाच्या एफडीवर 7 टक्के आणि वरिष्ठ नागरिक ग्राहकांसाठी 7.50% व्याज देत आहे.

याव्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडिया (state Bank of India) सामान्य ग्राहकांसाठी एक वर्षाच्या एफडीवर 6.80% आणि वरिष्ठ नागरिक ग्राहकांसाठी 7.30% व्याज देत आहे.(bank of badoda) बँक ऑफ बडोदा आपल्या सामान्य ग्राहकांना एक वर्षाच्या फिक्स डिपॉझिट वर 6.75 टक्के आणि आपल्या वरिष्ठ नागरिक ग्राहकांसाठी 7.25 टक्के व्याज देत आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top